नाशिक | प्रतिनिधी Nashik
जुन्या वादातून दाेन गटांत हाणामारी हाेताच त्यातील जखमी व्यक्ति उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाेहाेचले. तेव्हा येथील कॅज्युल्टीत (आपत्कालीन) कक्षात दाेन्ही गटांत वाद उफाळल्याने परत एकमेकांना हाणामारी करुन दगड विटांचा मारा करुन आपात्कालिन कक्षाची ताेडफाेड केली. दाेन्ही गटांचे वैयक्तिक भांडणे असतानाच, त्यांनी अत्यावश्यक कक्षाची ताेडफाेड करत उपस्थित डाॅक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या जिवितास धाेका निर्माण करत दहशत माजविली. त्यामुळे आता सीसीटीव्हीनुसार सर्वच संशयितांचा शाेध भद्रकाली व सरकारवाडा पाेलिसांनी सुरु केला आहे. ही घटना आज रविवारी(दि. २३) सायंकाळी सात वाजता घडली.