Friday, May 1, 2026
Homeक्राईमCrime News : वांजोळी, घोडेगावात दोघांकडून 2 गावठी कट्टे व 4 जिवंत...

Crime News : वांजोळी, घोडेगावात दोघांकडून 2 गावठी कट्टे व 4 जिवंत काडतुसे जप्त

दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत 27 गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा तालुक्यातील वांजोळी व घोडेगाव येथे गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघा आरोपींकडून 2 गावठी कट्टे व 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक केलेल्या एका आरोपीवर 9 तर दुसर्‍या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत 18 गुन्हे असे दोघांवर 27 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा हा चारचाकी वाहनातून गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पथक वांजोळी शिवारात सापळा लावून थांबले असता वांजोळीकडुन एमआयड़ीसीकडे एक पांढर्‍या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. पथकाने वाहन थांबविले असता चालक वाहन थांबवूृन पळुन जावू लागला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. याने त्याचे नाव नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट (वय 34) रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातून 30 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, 5 लाख रुपये किमतीचे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा 5 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट याचेविरुद्ध पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 78/2026 आर्म ऍक़्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत. नितीन आल्हाट याचेवर यापूर्वी सोनई पोलीस ठाण्यात 5, एमआयडीसी अहिल्यानगर पोलीस ठाण्यात एक, येरवडा (जि. पुणे) पोलीस ठाण्यात एक तसेच नेवासा व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे मारामारी, आर्म अ‍ॅक्ट, जीवे मारण्याचा प्रयत्न असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत.

घोडेगाव शिवार
दुसर्‍या घटनेत स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घोडेगाव शिवारात सापळा लावून थांबले असता. राजेगावकडून घोडेगावकडे एक पांढर्‍या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबवून चालकास ताब्यात घेवून त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय 31) रा. कृष्णानगर झोपडपट्टी घोडेगाव ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातून 30 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे व 4 लाख रुपये किमतीचे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकूण 4 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाठ यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 79/2026 आर्म ऍक़्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे. शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख याच्याविरुध्द यापूर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सोनई येथे 15, एमआयडीसी अहिल्यानगर येथे एक, वाळुंज जि. छत्रपती संभाजीनगर येथे एक व शनिशिंगणापूर येथे एक गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरील प्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपीविरुध्द कारवाई करुन त्यांच्याकडून दोन गावठ्ठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...