त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar
निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं
निवृत्ति निवृत्ति नाम घेतां ।
जन्म सार्थक तत्वतां
निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति
निवृत्ति नामाचा निजछंद ।
एका जनार्दनीं आनंद
असे अभंग सादर करीत वारंकर्यांनी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर गजबजले.
रविवारी (दि.16)रात्री अकरा वाजता चंदनाची उटी विधिवत महापूजेने आणि भजन कीर्तनाने उतरवली भाविकांना प्रसाद म्हणून वाटली .भाविक उटी अंगी कपाळी प्रसाद रुपाने लावली उटीचा सुगंध दरवळला.उटी अंगावर पडताच भाविक धन्य झाले. उटी मिळवण्यासाठी भाविकांची चधाओढ दिसली.
प्रतिवर्षाप्रमाणे संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची उटीची वारी विधिवत पूजा किर्तन,भजन करुन संत निवृत्तिनाथांच्या संजावनी समाधीला चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला. रात्री उटी उतरवून वाटप करण्यात आली.कुठे मिळतात भाविकांना भाविक वारकरी भाविक धन्य धन्य कृतार्त झाले.दरवर्षी हजारोच्या संख्येने वारकरी या वारीला येत असतात, महाराजांच्या संजीवन समाधीला चंदनाची उटी परंपरेप्रमाणे दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये महाराजांच्या समाधीला लावण्यात आली.
यावेळी संतनिवृत्तिनाथहाराज समाधी ट्रस्ट अध्यक्ष निलेश गाढवे,सचिव सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर ठोंबरे,राहुल हे सामील होते.दिवसभर विविध ठिकाणाहून आल्या दिंडया मधून हरिनामाचा गजर चालू होता.ट्रस्ट च्या वतीने दर्शनबारीसह विविध सुविधा वारकरी भाविकांना पुराविण्यात आल्या होत्या.साळुंखे,कांचनताई जगताप ,माधवदास राठी,ठोंबरे,पुजारी गोसावी आदी सह व्यवस्थापक गंगाराम झोले,संदीप मुळाणे, मनोज भांगरे दादा आचारी आदी उपस्थित होते.
उटीचा प्रसाद घेऊन वारकरी भाविक कृतज्ञता व्यक्त करीत होते. एकादशी मुळे मोठ्या प्रमाणावर वारकरी दर्शनासाठी आले छोट्या छोट्या स्वरूपात जवळपास 25 दिंड्यांनी हजेरी लावली.कडक उन असताना ही भाविकांची उत्साह मोठा दिसला. परिसर टाळ मृदुंग संत निवृत्तीनाथांच्या जयघोषाने दुमदमला.
मंदिर परिसरात मंडपाचे नियोजन करण्यात आले होते.पन्नास हजाराच्य वर वारकर्यांनी उपस्थित लावली.वरुथिनी एकादशीला दुपारी दीड वाजता श्री संत निवृत्तीनाथांच्या समाधीस शीतल सुवासिक चंदनाची उटी गंध लावण्यात आले. प्राणीमात्रांना उन्हाळ्याचा त्रास होतो उन्हाळा देवाला असा त्रास होऊ नये या भावनेने उटी गंध लावण्यात येते. तत्पूर्वी संत निवृत्तीनाथांच्या समाधीची महापूजा करण्यात आली.वारकरी संप्रदायातील मान्यवर प्रवचनकार कीर्तनकार वारकरी संघटनेचे प्रतिनिधीआदींची उपस्थिती होती.