Saturday, May 4, 2024
Homeजळगाववर्सी महोत्सव # भक्तीमय वातावरणाने बहरला सिंधी कॉलनी परिसर

वर्सी महोत्सव # भक्तीमय वातावरणाने बहरला सिंधी कॉलनी परिसर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वर्सी महोत्सवाच्या (Varsi Festival) दुसर्‍या दिवशी पंचामृत स्नान, महाआरती (Mahaarti) महिला मंडळाच्या (Women’s Board) भजन (bhajan) कार्यक्रम, नाटिकांतून सिंधी कॉलनी परिसर (Sindhi Colony area) हा भक्तीमय (devotional) झालेला होता. वर्सी महोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने महोत्सवाला भाविकांची (Devotees) उपस्थिती लाभली होती.

- Advertisement -

पूज्य श्री अमर शहीद संत कवरराम साहब यांचा (65) वा,पूज्य सतगुरू श्री संत बाबा हरदासराम साहब यांचा (45) वा तर बाबा गेलाराम साहेब यांचा (14) वा वर्सी महोत्सव अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य संत कंवरनगर सिंधी पंचायत यांच्यातर्फे आयोजित केला आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पंचामृत स्नान व महाआरतीने चैतन्यमय वातवारणात सुरवात झाली.

शेकडो सिंधी बांधवांनी केले रक्तदान

दुपारी एक वाजता पुज्य सेवा मंडळ येथे रक्तदान शिबीराची सुरवात झाली. यावेळी शेकडो बाबाच्या भक्तांनी रक्तदान केेले. दोन दिवस हे रक्तदान शिबीर चालणार आहे. रक्तदानातून अनेकांचे जीव वाचवावे असे आ़वाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

देशभरातील भाविक जळगावनगरीत

वर्सी महोत्सवाला देशभरातील नागरिक दाखल होत असून गुरूवारपासून जळगाव नगरीत भाविक येण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी देखील मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून भाविकांसाठी भोजन, नाश्तासाचे भंडारे, राहण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.

भक्तीमय वातावरण

वर्सी महोत्सवात शुक्रवारी दुपारी चार वाजता मोहाडी रोड येथील दौलत नगर येथील संत बाबा गेलाराम उद्यानात महिला मंडळाचा भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी बाहेरगावारून आलेल्या महिला व शहरातील महिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच साई सुखदेेवलाल राजकोट, साई फकीराराम (नागपूर), साई हरी राम उज्जैन, साई अमर धाम (उल्हासनगर) यांचे शिष्य ईश्वरलाल, साई हरचूराम दरबारचे शिष्य गोपी राम यांचे कार्यक्रम झाले.

तर रात्री बाबा की महिमा, पटापटी जलगाव टोली (विशनी इसरानी-गांधीधाम),राम श्याम म्युझिकल पार्टी भोपाळ, यार कंवर दिलदार कंवर बाबल प्यारो जळगाव वारो गृपतर्फे नाटिका, अनिल भगत उल्हासनगर, रिध्दी-सिध्दी डान्स गृपतर्फे नृत्य कार्यक्रम यावेळी झाला.

आज अंखड पाठ

15 रोजी अंखड पाठ साहेबची समाप्तीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी शहरातील सर्व सिंधी बांधव आपला व्यवसाय बंद ठेवून कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या