Friday, September 20, 2024
HomeमनोरंजनVarun Dhawan joins Sunny Deol in 'Border 2': वरुण झळकणार 'बॉर्डर-२' मध्ये!

Varun Dhawan joins Sunny Deol in ‘Border 2’: वरुण झळकणार ‘बॉर्डर-२’ मध्ये!

बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यातच या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘बॉर्डर २’ चित्रपटात सनी देओलसोबत ‘स्त्री २’ चित्रपटातील एक दमदार अभिनेता पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

सध्या वरुण धवन ‘स्त्री २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील कॅमिओमुळे चर्चेत आहे. आता बॉर्डर २ बाबतही त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार, वरुण सनी देओलसोबत बॉर्डर २ मध्ये दिसणार आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या चित्रपटाची स्टारकास्ट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यातच आता वरूणचे नावही समोर आले आहे.

हे ही वाचा : लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनेच…; सलमान खानचा जबाबात धक्कादायक खुलासा

१९९७ मध्ये सनी देओलच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. या देशभक्तीपर चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आहे आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. ‘बॉर्डर २’ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून सनी देओलच दिसणार आहे. ‘बॉर्डर २’साठी अभिनेता आयुष्मान खुरानाच्या नावाचीही चर्चा आहे. यातच आता या चित्रपटात अभिनेता वरुण धवन देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याने चाहते खुश झाले आहेत.

हे ही वाचा : हवाई सुंदरी ते अभिनेत्री! ‘असा’ आहे प्रतिक्षा होन्मुखेचा फिल्मी प्रवास

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री २’ नुकताच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये १०० कोटींच्यावर कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे. त्याचप्रमाणे ‘मुंज्या’ या चित्रपटामध्ये देखील वरुण धवनने कॅमिओ केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या