Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

पुणे |प्रतिनिधी| Pune

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांचा मुलाला 30 लाखांची खंडणी (Ransom) मागितली आहे. खंडणी नाही दिल्यास गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून धमकी दिली आहे.

- Advertisement -

मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट (Marriage Certificate) बनवून 30 लाखांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. खंडणी नाही दिल्यास गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी (Threat) देखील देण्यात आली आहे. बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून धमकी दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत मोरेंच्या मुलाला धमकी (Threat) आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. याबाबत आमच्याकडे तक्रार आल्याचे पोलिसांनी सांगितले. धमकीप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

समाज माध्यम एका मेसेजच्या माध्यमातून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये रुपेश याच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र बनविण्यात आले आहे. याच्यामाध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता. जर खंडणी न मिळाल्यास लग्नाचे हे प्रमाणपत्र व्हायरल करीन तसेच, गोळी झाडून हत्या करीन, अशी धमकी देण्यात आली आहे, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

दरम्यान, रुपेश मोरे याला कोणी धमकी (Threat) दिले आहे, त्याचे नाव समोर आलेले नाही. परंतु, वसंत मोरे यांनी याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharatiy Vidyapith Police Station) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हा संपूर्ण प्रकार सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस तपास सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या