Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला लावणार विजयाचा गुलाल

वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला लावणार विजयाचा गुलाल

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बी डी भालेकर मैदान, शालीमार, नेहरु गार्डन, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालाय या परिसारातून भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

या प्रसंगी, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे, पवन पवार, बजरंग शिंदे, कविता गायकर, आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी करण गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं असल्याचं त्यांनी नमुद केलं.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणुक लढवणार आहोत. या जिल्ह्यात शेती, कामगार, विकास, सहकार, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, पर्यावरणाचे असे विविध प्रश्न आहेत. आम्हाला विकासावर बोलायचय विकासावरच लढायचं आहे. ते टीका टिप्पणी त्यांच काम आहे. खोके बोके एकदम ओके, कोण म्हणतंय खुद्दार कोणी गद्दार ते म्हणत राहणार आहे, आम्हाला बाळासाहेबांनी विचाराच्या अनुशंगाने उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करुन वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला विजयाचा गुलाल लावायचा असल्याची भावना करण गायकर यांनी व्यक्त केल्या .

- Advertisment -

ताज्या बातम्या