Tuesday, December 10, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र?

विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र?

मुंबई । Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट असून प्रामुख्याने यांच्यात लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर लढाई होणार आहे. दरम्यान, विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीने आपले बळ वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश आले नाही. दरम्यान, आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल तसेच लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात. आतापासूनच आपण तशी तयारी करायला हवी असा प्रस्ताव मी काँग्रेससमोर ठेवला आहे, असं आंबेडकर म्हणाले. आंबेडकरांच्या या स्पष्टीकरणानंतर आता आगामी विधानसा निवडणुकीत काय होणार, असं विचारलं जातंय. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडीच्या एकत्रिकरणाचा प्रयोग अयशस्वी ठरला. आंबेडकरांनी अनेक मतदारसंघांवर आपले उमेदवार दिले आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीला ही युती होणार का? असे विचारले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत का बिनसलं?

वंचित बहजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी वंचित आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात अनेक बैठका झाल्या. पण जागा वाटप आणि आणि अन्य मुद्यांमुळे या पक्षात एकमत होऊ शकले नाही. आता बंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या