Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहागड्या भाज्यांचा उच्चांक

महागड्या भाज्यांचा उच्चांक

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

महागाई कमी होण्याचा ट्रेंड जवळपास संपुष्टात आला असून, जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. मेमध्ये किरकोळ महागाई 4.31 टक्क्यांवर होती.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सरकारने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली. किरकोळ महागाई मे महिन्यात 4.31 टक्के होती, तर एक वर्षापूर्वी जून 2022 मध्ये ती सात टक्के होती.

सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.49 टक्के होता तर मे महिन्यात तो 2.96 टक्के होता. सीपीआयमध्ये अन्न उत्पादनांचे वजन जवळपास निम्मे मोजले जाते. जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली असली तरी ती रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्कयांच्या समाधानकारक पातळीपेक्षा खाली आहे.

किरकोळ महागाई 2 ते 4 टक्कयांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँक किरकोळ चलनवाढीची आकडेवारी लक्षात घेऊन द्वि-मासिक चलनविषयक आढावा घेते. गेल्या महिन्याच्या चलनविषयक आढाव्यात रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट रेपो 6.5 टक्कयांवर कायम ठेवला होता.याबरोबरच एप्रिल-जून तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 4.6 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला होता.

पाच एकर कोथिंबिरीला14 लाखांचा दर

निफाड/पिंपळगाव बसवंत । तालुक्यातील तारुखेडले येथील शेतकर्‍याच्या पाच एकरमधील कोथिंबिरीला सोन्याचा भाव मिळाला. नाशिक येथील व्यापार्‍याने चक्क 14 लाख रुपयांची बोली लावली असून, 51 हजार रुपये इसार देत उर्वरित रकमेचा धनादेश दिला आहे. तारुखेडले (ता. निफाड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामनाथ शिंदे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात कोथिंबिरीचे पीक घेतले. सदर कोथिंबीर नाशिक येथील व्यापारी सुनील एमडी यांनी 14 लाख एक हजार रुपयांना खरेदी केली. व्यवहार झाल्यानंतर तत्काळ 51 हजाररुपये इसार दिला. तर उर्वरित रकमेचा धनादेश दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांनी 3 जून रोजी कोथिंबीर बियाणे टाकल्यानंतर अवघ्या 40 दिवसांत पिक घेतले. या पिकासाठी शिंदे यांना शेत तयार करण्यासाठी 15 हजार रुपये, शेत बांधण्यासाठी 7 हजार 500 रुपये, 60 किलो बियाण्यासाठी 21 हजार रुपये, मजुरी 27 हजार 500 रूपये, औषध फवारणीसाठी 10 हजार, रासायनिक खतांसाठी 18 हजार 500 रुपये याप्रमाणे 99 हजार 500 रुपये खर्च आला. खर्च वजा जाता शिंदे यांना 13 लाख 1 हजार 500 रुपये निव्वळ नफा मिळाला.

मेहनतीला फळ मिळाल्याचा आनंद

मी दरवर्षी आपल्या शेतात कोथिंबिरीचे पिक घेत असतो. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. यावर्षी तर आपल्या कष्टाचे चीज झाले. पाच एकर शेतातील कोथिंबिरला 14 लाख 1 हजार रुपये मिळाल्याने कष्टाचे चीज झाले.

– ज्ञानेश्वर शिंदे, शेतकरी, तारुखेडले

उंबरखेडला एकरी दोन लाख

उंबरखेड येथील शेतकरी राजेंद्र निरगुडे यांच्या एक एकर कोथिंबिरीला दोन लाख रुपये जागेवरच दर मिळाला. पिंपळगाव बसवंत येथील देवरत्न आडतचे संचालक राजेंद्र निरगुडे यांची पाच एकर शेती आहे. द्राक्षपंढरी असूनही द्राक्ष न लावता नगदी पिके घेण्यात ते अग्रेसर आहेत. मराठी महिन्याच्या अंदाजानुसार दरवर्षी आषाढ महिन्यात मेथी, कोथिंबीर ही पिके ते घेतात. सध्या शेपू, मेथी, कोथिंबीर शेतात असून दोन एकर कोथिंबीरसध्या काढणीला आहे. त्यातील एक एकर कोथिंबीर त्यांनी बाजार समितीत न नेता जागेवरच दोन लाखाला दिली. पावसाचे दिवस असून कधी नुकसान होईल, याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, मजुरी, वेळ व सध्या चांगला भाव लक्षात घेता जागेवरच व्यवहार करणे योग्य वाटल्याने त्यांनी एकता ग्रुपचे संचालक व व्यापारी भिमा शिंदे, उत्तम गडाख, रामेश्वर शिंदे, समाधान पवार यांना कोथिंबीर विक्री केली.

टोमॅटो भाव नियंत्रणावर केंद्र सरकारचा उतारा

टोमॅटो दरांनी रेकॉर्ड ब्रेक उच्चांक गाठल्याने आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने शेतमाल खरेदी संस्था अर्थात नाफेड आणि सहकारी संघांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने टोमॅटो वितरीत करण्यात येणार आहे.

मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो 200 रुपये किलोपर्यंत दराने विक्री केले जात आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटोची खरेदी करणार आहेत. केंद्रीय मंत्रालयानुसार जिथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत, तिथे स्वस्त किमतीत विक्री केले जातील.

मंत्रालयानुसार, आगामी काळात लवकरच टोमॅटोचे दर कमी होतील. वास्तविक ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. शिवाय जुलै महिन्यात मान्सूनमुळे भाजीपाल्याची वाहतूक करण्यात अडचणी येतात. त्यामुळेदेखील दरवाढ होते. भारतात टोमॅटोचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात सर्वच भागांमध्ये होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या