Saturday, March 29, 2025
Homeनाशिकमतदानाला जाताना वाहनास अपघात; १८ जण जखमी

मतदानाला जाताना वाहनास अपघात; १८ जण जखमी

ननाशी

सावरपाडा ता.दिंडोरी येथील मजुरांच्या वाहनाला मतदान करण्यासाठी जात असताना ननाशी जवळील शिवपाडा गावाजवळ छोटा हत्ती वाहनाला अपघात होऊन 18 मजूर किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

- Advertisement -

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सावरपाडा ता . दिंडोरी येथील मजूर साकोरे ता . निफाड येथे होते.लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे छोटा हत्ती वाहनाने सावरपाडा येथे येत असताना ननाशीच्या अलीकडे असलेल्या शिवपाडा गावानजीक गाडीचे ड्रायव्हर साईड (उजव्या बाजूचे) पाटे तुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन अपघात झाला.

यात गाडीतील सर्व मजुरांना मुका मार लागला आहे.सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. सर्व जखमींवर ननाशीतील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. या जखमींमध्ये प्रमिला गायकवाड ,ललिता गायकवाड , वनिता महाले ,पुरुषोत्तम प्रधान ,रेखा प्रधान ,भारती शिंगाडे ,दिगंबर शिंगाडे ,ज्ञानेश्वर शिंगाडे, हेमंत गायकवाड, निर्मला महाले ,आरती महाले, जनाबाई धूम, निवृत्ती धूम ,देविदास महाले, करण शिंगाडे, राहुल शिंगाडे, रेखा शिंगाडे ,पंढरीनाथ शिंगाडे , सर्व रा . सावरपाडा ता.दिंडोरी आदींचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अरे बापरे…, धुळ्यात 300 किलो बनावट पनीर जप्त

0
धुळे : (प्रतिनिधी) । अरे बापरे…, धुळ्यात बनावट पनीर तयार करण्याचा कारखाना आढळून आला असून आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार...