Saturday, May 4, 2024
Homeनाशिकभूमिगत पाईपलाईनच्या खड्ड्यांमुळे होताय वाहनांचे अपघात

भूमिगत पाईपलाईनच्या खड्ड्यांमुळे होताय वाहनांचे अपघात

इंदिरानगर । Indiranagar

इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले असून या खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. मात्र पाईप लाईन टाकून झाल्यावर ठेकेदाराने याठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात खड्डे बुजवल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

पाथर्डी फाटा येथील गणेश नगर इंदिरानगर परिसरातील आत्मविश्वास सोसायटी, चार्वाक चौक, इंदिरानगर पोलीस ठाणे जवळील परिसर, निरंजन पार्क याठिकाणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने रस्ते खोदून भूमिगत गॅस लाईन टाकण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण झाले असतानाही या कंपनीच्या ठेकेदाराकडून रस्त्यांवरील खड्डे अस्ताव्यस्त, तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आले आहे.

यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी चढ-उतार तसेच खडी मिश्रित मातीचे ढिगारे पसरले आहेत. यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही याठिकाणी सपाटीकरण केले जात नसल्याने येथील काही नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्याची सपाटीकरण केले आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असताना दुचाकींचा घसरून अपघात होतो. तसेच रस्त्यावर माती साचल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. सोसायटी मधील नागरिकांना वाहने पार्किंग करायचे असताना रस्त्यांवरील ढिगारे अडथळे निर्माण करीत आहे. त्यामुळे मातीचे ढिगारे काढून रस्त्यांवर सपाटीकरण करून रस्ते पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी इंदिरानगर वासियांकडून कडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या