Thursday, April 10, 2025
Homeक्राईमCrime News : वाहनातील बॅटर्‍या चोरणार्‍याच्या मुसक्या आवळल्या

Crime News : वाहनातील बॅटर्‍या चोरणार्‍याच्या मुसक्या आवळल्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहनांच्या बॅटरी चोरीच्या दोन गुन्ह्यांत पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 32 हजारांच्या बॅटरी व 50 हजारांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. प्रेम जितेंद्र साठे (रा. केडगाव देवी, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीच्या दाखल गुन्ह्यात प्रेम साठे हा आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला आरोपीच्या शोधाकामी रवाना केले. पोलीस पथकाने संशयित आरोपी प्रेम साठे याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

- Advertisement -

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने दोन्ही गुन्ह्यांतील सुमारे 82 हजारांच्या चोरलेल्या बॅटरी काढून दिल्या. तसेच त्याच्याकडून दुचाकीही हस्तगत केली. गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले करीत आहेत.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक योगीता कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, संदीप पितळे, विशाल दळवी, पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकाण, महेश पवार, सोमनाथ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोहज देवढे सहकारी संस्थेत 14 लाखांचा अपहार

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi तालुक्यातील मोहज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये 14 लाख 10 हजार 369 रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले...