Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पालकमंत्र्यांचा इशारा

वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पालकमंत्र्यांचा इशारा

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्या गुंडांची यापुढे गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात नाशिक रोड येथील धोंगडे मळा परिसर व विहित गाव येथे गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ व काचा फोडून नुकसान केले होते या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करून वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक केली तर काहींना मोक्का कारवाई करण्यात आली.

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद

सदरचा मुद्दा हा राज्याच्या विधानसभेत सुद्धा गाजला. दरम्यान या घटनेनंतर अधिवेशन संपताच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी धोंगडे नगर येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुसे म्हणाले की, यापुढे असे कृत्य करणाऱ्यांना पोलीस धडा शिकवतील. त्याचप्रमाणे ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

यापुढे अशा घटना घडणार नाही याबाबत पोलिसांनी सतर्क करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून गुंडावर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी त्यांनी पोलिसांना केली.

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

यानंतर दादा भुसे यांनी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. बिटको हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. डॉक्टरांकडून काळजी घेतल्या जात नाही, असा आरोप सुद्धा यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, ज्योती कर्जुल, ज्योती खोले, हरीश भडांगे यांनी केला.

यावेळी दादा भुसे यांनी बिटको हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, विजय पगारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, बाबुराव आढाव, गणेश कदम, नितीन खर्जुल, विक्रम कदम, श्याम खोले, शिवा ताकाटे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

येवला तालुक्यातील जलसंधारणाच्या ३३ बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली

- Advertisment -

ताज्या बातम्या