पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
मंगळवारी (दि.25) पहाटे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पळवे खुर्द शिवारात अज्ञात वाहनाची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी पहाटे 3.45 मिनिटांनी पुणे अहिल्यानगर महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द गावच्या शिवारात हॉटेल गारवाजवळ एका आज्ञात वाहनाने पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली.
या अपघातात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी जखमी व्यक्तीस पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्याने तपासणी करत व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सागितले. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील कुटे पुढील तपास करत आहे.