Monday, June 17, 2024
Homeनगरअज्ञात वाहनाच्या धडकेत पोहेगावात बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोहेगावात बिबट्या ठार

घारी |वार्ताहर| Ghari

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे संगमनेरच्या (Sangamner) दिशेने जाताना कॅनॉलच्या नजीक असलेल्या चंद्रहंस औताडे यांच्या वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार (Leopard Death) झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.

बिबट्या (Leopard) हा मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो. मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे. अशीच घटना कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील पोहेगाव (Pohegav) येथे बिबट्या आपले भक्ष शोधत असताना कोपरगाव संगमनेर रस्ता ओलांडत असताना रात्रीच्या वेळेला अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे रस्त्यातच मृत्युमुखी पडला. वनींकरण विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे यांनी घटनास्थळी पथकासह धाव घेवून पंचनामा केला. बिबट्याचे (Leopard) शवविच्छेदन करून त्याच्यावर पुढील संस्कार केले जातील आणि वनविभागाच्या (Forest Department) नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल असे प्रतिभा सोनावणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या