Friday, November 22, 2024
Homeक्राईमवाहनचोरी करणार्‍या चोरट्यासह विधीसंघर्षित बालकास पकडल

वाहनचोरी करणार्‍या चोरट्यासह विधीसंघर्षित बालकास पकडल

तीन वाहनांसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

घारगाव |वार्ताहर| Ghargav

आळेफाटा परिसरात चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या चोरट्याला आळेफाटा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सोमवारी (दि. 1 जुलै) दिली. त्याच्याकडून तीन वाहने ताब्यात घेत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाहन चोरी करणार्‍या चोरट्याचे नाव अभिजीत संतोष खताळ (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) असून त्याला चोरीसाठी मदत करणार्‍या विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत होडगर यांनी सांगितले, की आळे गावच्या हद्दीतून 2 जून 2024 रोजी दादासाहेब सुखदेव बहिरट यांच्या राहत्या घरापाठीमागील दरवाजाच्या समोरुन पिकअप गाडी (एमएच. 14 ए.झेड. 3586) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी पोलीस अंमलदारांचे गुन्हे शोध पथक बनवून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे पथक सदर गुन्ह्यातील आरोपींचा व गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या पिकअप गाडीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून शोध घेत असताना, नमूद गुन्हे पथकाला आरोपी अभिजीत खताळ व त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालक यांनी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

या बातमीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासह केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पिकअप गाडी जप्त करण्यात येऊन तसेच या व्यतिरिक्त माळवडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व ठाणगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथून चोरी केलेले दोन पिकअप वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, अशी एकूण दहा लाख रुपये किंमतीची तीन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक पंकज पारखे, अमित पोळ, अमित माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या