धुळे ।Dhule। प्रतिनिधी
व्यंकट रमणा गोविंदा… (Venkat Ramana Govinda..) म्हणत अत्यंत उत्साहात जयघोष (Cheers in excitement) करीत आणि ढोल ताशांच्या (sound of drums) गजरात नाचत भगवान श्री बालाजीच्या (Lord Sri Balaji) रथोत्सवाला प्रारंभ (Rathotsava begins) झाला. सकाळी 9 वाजता अग्रवाल परिवाराच्या हस्ते आरती झाली. यावेळी पोलीस अधीक्षकांसह अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
विविध रंगी आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात आला. यंदा रथाच्या दर्शनी भागावर भगवान शंकराच्या महाकालेश्वराचा मुखवटा सजविण्यात आला. सुमारे 142 वर्षांची ही परंपरा खंडीत होवू न देता कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत विधिवत पूजा अर्चा करुन पाच पाऊले बाहेर ओढून रथ जागेवर दर्शनासाठी उभा करण्यात आला होता.
मात्र यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने पुन्हा पुर्वीसारखा अतिशय जल्लोषात रथोत्सव साजरा झाला. तरूणांसह आबाल वृध्दांनी मोठी गर्दी केली. रथाच्या पुढे शिस्तबंध्द जाणारे ढोल पथक आणि बारापावली नृत्य लक्ष वेधून घेत होते. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे, चेतन मंडोरे, सुनिल अग्रवाल यांनी आरती करुन रथ ओढला.
धुळ्यातील बालाजी रथोत्सवाचे हे 143 वे वर्ष आहे. शहरातील गल्ली क्र.4 मधील बालाजी मंदिरापासून रथोत्सवाला सुरूवात झाली. रथाच्या पहिल्या आरतीचा मान परंपरेनुसार स्व.बाबुलाल अग्रवाल यांचे वारसदार कमलनयन अग्रवाल व अग्रवाल परिवाराला देण्यात आला. पुढच्या बाजुला फुलांनी भगवान महादेव, नंदी आणि त्रिशुल साकारण्यात आला आहे. विद्यार्थी, तरूण, महिलांसह सर्वांनीच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रथ मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या.
ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप- रथ मार्गात विविध संस्था व संघटनांकडून भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या रथोत्सवासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. यामुळे शहरातील या प्रमुख मार्गांना यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. रथावर विराजमान भगवान बालाजीची ठिकठिकाणी आरती करण्यात आली. तर काही ठिकाणी रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. रथोत्सवामुळे जिल्हा प्रशासनाने रहदारीचे मार्ग वळविले आहेत. तसेच ठिकाठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार्या या रथोत्सवात रथ ओढण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचेही दिसले.