Wednesday, May 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजेष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

जेष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

पुणे | प्रतिनिधी

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटात ‘श्याम’ची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते माधव वझे (वय ८५) यांचे बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी तसेच मुलगा अभिनेता-दिग्दर्शक अमित वझे असा परिवारआहे.

- Advertisement -

वझे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बुधवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले होते. चित्रपट, साहित्य, नाटय़ यांसह विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी त्याच्ंया पार्थिवाचे दर्शन घेतले. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला. वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. अभिनेता, दिग्दर्शक, नाटय़गुरू आणि नाटय़ समीक्षक अशी ओळख असलेल्या वझे यांना राज्य नाटय़ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदके मिळाली होती. भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. गोवा येथील कला अकादमीच्या नाटय़ विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलेले वझे आंतरराष्ट्रीय नाटय़ समीक्षक संघाचे सभासद होते. नाटय़ संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शनही माधव वझे यांनी केले होते.
.
माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
– श्यामची आई (बालनट)
– डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट)
– थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट)

माधव वझे यांची पुस्तके
– प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन -माधव वझे)
– रंगमुद्रा (अनेक नाटय़कर्मींची व्यक्तिचित्रणे)
– श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)
– नंदनवन (मुलांसाठी)
– समांतर रंगभूमी : पल्याड- अल्याड

पुरस्कार
– ‘रंगमुद्रा’; या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार
– ‘श्यामची आई, ‘आचार्य अत्रे आणि मी’ या पुस्तकाला पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार
– ‘समांतर रंगभूमी,  पल्याड- अल्याड या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे नगर वाचन मंदिराचा पुरस्कार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक

0
दिल्ली | वृत्तसंस्था 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर, सैन्य आणि सरकारने पत्रकार परिषदेद्वारे संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र...