Saturday, May 3, 2025
Homeमनोरंजनमराठी रंगभूमीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. ते ७५ वर्षांचे होते.

- Advertisement -

रात्री उशिरा एक वाजता विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथील राहत्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

आज दुपारी 1 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्याच्या या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ मे २०२५ – गोदा प्रदूषणमुक्तीचे स्वप्न

0
एकशे दोन वर्षांची परंपरा लाभलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेला गोदाकाठी कालपासून सुरुवात झाली. ही व्याख्यानमाला नाशिककरांचे पिढ्यान-पिढ्या बौद्धिक पोषण करीत आहे. यानिमित्ताने जागतिक कीर्तीचे व्याख्याते...