Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

पुणे | Pune

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती खालावाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर (Shirish Yadgikar) यांनी दिली आहे…

- Advertisement -

विक्रम गोखले यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकृती खालावल्याने विक्रम गोखले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. त्यांचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत, असे शिरीष याडगीकर यांनी म्हटले आहे.

श्वसनाचा त्रास होत असल्याने विक्रम गोखले यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : युवकाची डोक्यात दगड घालून हत्या

0
नवीन नाशिक | New Nashik कामटवाडे गावासमोरील (Kamtwade Village) अमरधाम रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा (Boy) तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दाड व फरशी टाकून...