Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

मुंबई | Mumbai

आपल्या दमदार अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने अवघ्या रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री वहीदा रेहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

मनोरंजन विश्वातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची गणना होते. या वर्षी हा सन्मान अभिनेत्री वहीदा रेहमान यांना मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

वहिदा रेहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात १९३८ मध्ये झाला. हे गाव आता मद्रास या शहराचे उपनगर आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द तमीळ आणि तेलुगू चित्रपटांपासून सुरु केली. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांमधील अभिनयामुळेच. वहीदा रेहमान या जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देवआनंद, गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केलं आहे. तसंच दुसऱ्या इनिंगमध्ये चरित्र भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. ‘रंग दे बसंती’ सिनेमातल्या मिसेस राठोड असोत किंवा ‘ओम जय जगदीश’ सिनेमातल्या सरस्वतीदेवी बत्रा सगळ्याच भूमिका त्यांनी खूप ताकदीने साकारल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या