Sunday, April 27, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन (Yusuf Husain) यांचे आज निधन झाले आहे. निर्माते आणि युसुफ यांचे जावई हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावरुन युसुफ हुसेन यांच्या निधनाची माहिती दिली. युसूफ खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता आणि अभिनेते युसूफ हुसैन यांच्या निधनाने हंसल मेहता हादरून गेले आहेत. जड अंत:करणाने ही दुःखद माहिती देताना त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे की, ‘मी आज खऱ्या अर्थाने अनाथ झालो आहे. आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही.”

युसुफ हुसेन यांनी रईस, धूम २, दिल चाहता है, ओह माय गॉड, विवाह, राज, हजारों ख्वाइशे ऐसी, शाहिद, क्रिश ३, दबंग ३, द ताश्कंद फाइल्स, जलेबी, खोया खोया चांद, क्रेजी कुक्कड फॅमिली, रोड टू संगम या सिनेमांमध्ये…

तसेच सीआयडी, तुम बिन जाऊ कहां, कुमकुम : एक प्यारा सा बंधन, श्श्शू… कोई है, मुल्ला नसरुद्दीन या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या विमान प्रवासी संख्येत ५४ टक्के वाढ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विमानाने (Plane) जाणाऱ्या पर्यटकांचा आलेख उंचावत असून गत मार्चच्या तुलनेत ५४ टक्के प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. यासोबतच कार्गोसेवेतून मालवाहतुकीमध्येही...