मुंबई | Mumbai
ज्येष्ठ हिंदी व गुजराती अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या मागच्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होत्या. याच दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
तब्बल ४५ वर्षांपासून अभिनयसृष्टीत कार्यरत भैरवी यांनी आतापर्यंत अनेक हिंदी व गुजराती मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भैरवी यांनी अनेक चित्रपटांसह टीव्हि मालिकांध्ये अनेक भूमिका साकरलेल्या आहेत. तर हिंदीसह त्यांनी गुजराती चित्रपटामध्ये देखील काम केलं. नीमा डेन्जोंगपा या मालिकेतील त्यांच्या पुष्पा या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. तसेच सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके, एश्वर्या रॉय बच्चनच्या ताल चित्रपटामध्ये त्यांनी जानकी ही भूमिका साकरली होती. या चित्रपटातूनच त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
त्याचबरोबर व्हॉट्स योर राशी, हमराज, क्या दिल ने कहा व्हेंटिलेटरमध्ये त्या प्रतिक गांधीसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकरली होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही विश्वास मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला आहे.