Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे वयाच्या ९४ वर्षी निधन (passed away) झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृतीत खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात (Sushrusa Hospital) दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

सुलोचना लाटकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुलोचना लाटकर या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी मार्चमध्ये सुलोचना दीदी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुलोचना लाटकरांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्र्यंबकसह नाशिकमध्ये पावसाची हजेरी

सुलोचना लाटकर यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी १९९९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय २००४ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तर २००९ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, सुलोचना दीदींचा जन्म बेळगावमध्ये ३० जुलै १९२८ रोजी झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९४६ पासून केली. १९४६ ते १९६१ या काळात सासुरवास (१९४६), वहिनीच्या बांगड्या (१९५३), मीठ भाकर, सांगते ऐका (१९५९), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी २५० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या