Tuesday, September 15, 2026
HomeनगरSangamner : ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत

Sangamner : ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याचे सुपुत्र व तमाशा लोककलेसाठी आपले जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांचा दिल्लीत सोमवारी (दि.25) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला. राष्ट्रपती भवनात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडेकर यांना तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल आणि या कलेचे जतन आणि संवर्धन केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या चार दशकांपासून ते तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा ते आजतागायत यशस्वीपणे सांभाळत आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्षही आहेत. तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांना पद्म पुरस्कार जाहीर होताच महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचे वर्षाव झाला होता. आता पुरस्कार प्रदान झाल्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम...