बार्बाडोस –
Barbados
वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांची वेस्ट इंडिज महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजने ही माहिती दिली. 2022पर्यंत वॉल्श महिला संघाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतील. या काळात एकदिवसीय विश्वकरंडक आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे.
वॉल्श म्हणाले, ‘हे खूप चांगले आव्हान आहे. मी क्रिकेटला परत काहीतरी देऊ शकतो आणि वेस्ट इंडिज संघाच्या विकासासाटी मदत करू शकतो. मला असलेला अनुभव, खेळाचे ज्ञान, माझे संघटनात्मक कौशल्ये महत्त्वाची ठरतील, कारण आम्हाला संघसंस्कृती तयार करायची आहे.’
ते म्हणाले, ‘या वर्षाच्या सुरुवातीला ऑॅस्ट्रेलियामध्ये महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आणि भारताविरुद्धच्या मालिकेतही मी संघासमवेत होतो. त्यामुळे काय हवे आहे हे मला माहित आहे. संघात पात्रता आणि कौशल्य आहे. आमच्या अवेस्ट इंडिज संघात बरेच चांगले खेळाडू आहेत.’