Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrabhakar Karekar : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन

Prabhakar Karekar : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन

मुंबई | Mumbai

आपल्या धारदार आवाजात तडफदारपणे नाट्यपदे सादर करत रसिकांची वाहवा मिळविणारे प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर कारेकर (Pandit Prabhakar Karekar) यांचे दीर्घ आजाराने (illness) बुधवारी (दि.१२ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून पंडित प्रभाकर कारेकर यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

पंडित प्रभाकर कारेकर हे नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि गायनातील रंजकतेनं प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठीही अनेक संगीताचे कार्यक्रम केले. ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान (Sultan Khan) यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय ठरला होता.

पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म १९४४ साली गोव्यात म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात झाला होता. पण त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडे मुंबईत झाले होते. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. कारेकरांना तानसेन सन्मान (२०१४), संगीत नाटक अकादमी (२०१६), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांतक विभूषण पुरस्कार (२०२१) आदी पुरस्कारांनी (Awards) गौरवण्यात आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...