मुंबई | Mumbai
जेष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री जयंती (Kannada actor Abhinaya Sharade Jayanthi) यांचं निधन झालं आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या. बंगळुरूमधील (Bengaluru) आपल्या राहत्या घरी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जयंती यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. केवळ कन्नडच नाही तर इतर सहा भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
जयंती यांचा जन्म ६ जानेवरी १९४५ रोजी कर्नाटकमध्ये (Karnataka) झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. अभिनयाबरोबरच गायन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी काम केले होते. १९६० ते ८० ही तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती.
जयंती यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत (Cineworld) शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.