मुंबई
दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारत एक खोजचे संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने ट्वीट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला आहे.
रशियाने दिली सिंगल डोस व्हॅक्सीनला मंजुरी
३१ मे १९२७ रोजी वनराज भाटिया यांचा जन्म झाला होता. त्यांनी रॉयल अॅकेडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९५९ मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनव्याचे काम सुरु केले. त्यांनी ७००० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल दिले.
भारत एक खोजचे संगीत
वनराज यांनी मंथन, भूमिका, जाने भी दो यारों, 36 Chaurangi Lane, जुनून यासारख्या चित्रपटासाठी संगीत दिले. ‘भारत एक खोज’ ‘तमस’ या सारख्या टीव्ही शो साठी त्यांनी संगीत दिले. भारतातील वेस्टर्न क्लासिकल म्यूजिकचे सर्वात मोठे कंपोजर त्यांना म्हटले जाते.
महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी
अमित देशमुख यांच्यांकडून श्रद्धांजली
चित्रपट, मालिका आणि जाहिराती या तिन्ही क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत दिग्दर्शनाची छाप सोडलेल्या ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांच्या निधनामुळे भारतीय संगीताशी घट्ट नाळ असलेला पाश्चात्य संगीताचा जाणकार संगीतकार हरपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
” चित्रपटांच्या विषय, आशय आणि प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत देण्यातही त्यांचा हातखंडा होता. भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेख मेळ घालणाऱ्या थोर संगीतकाराला आपण मुकलो”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.