दिल्ली | Delhi
गीत जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. वाणी जयराम राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Veteran singer Vani Jayaram passes away)
वाणी जयराम यांचे निधन नक्की कशामुळे झाले याबाबतअद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र…नवरा पाहतच राहिला
यंदाच्या वर्षीच त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. वाणी जयराम यांनी अलीकडेच पार्श्वगायिका म्हणून करिअरची ५० वर्षे पूर्ण केली. १८ भारतीय भाषांमध्ये त्यांनी १०००० हून अधिक गाणी स्वरबद्ध केली होती. त्यांना ३ वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
…तर त्यांची सुंता झाली असती; अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली
वाणी जयराम यांनी हिंदीसह तमिळ, कन्नड आणि अन्य भाषांमध्ये पार्श्वगायन केले. १९७१ मध्ये वाणी जयराम यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली होती. ‘गुड्डी’ या चित्रपटाला त्यांनी आपला आवाज दिला होता.
ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकर अडचणीत, ITA ने घातली २१ महिन्यांची बंदी… काय आहे कारण?
या चित्रपटातील ‘बोल रे पपीहा’ हे गाणे त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले होते. यानंतर त्यांनी ‘एक मुठ्ठी आसमां’, ‘खून का बदला खून’ आणि ‘सोलवा सावन’सह अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.
थकीत पैशांची मागणी केल्याने कंपनी मालकावर हल्ला