Thursday, April 30, 2026
HomeनगरAhilyanagar : गोजातीय प्रजनन अधिनियमानुसार पशुवैद्यकीय सेवेसाठी नोंदणी सक्तीची!

Ahilyanagar : गोजातीय प्रजनन अधिनियमानुसार पशुवैद्यकीय सेवेसाठी नोंदणी सक्तीची!

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला, तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन कमी आहे. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशु पालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अन्वये लागू करण्यात आले आहे. याअधिनियमनाच्या अंमलबजावणीसाठी गोजातीय प्रजनन कामांमध्ये सहभागी प्रत्येक घटक यात रेत केंद्र, भ्रूणप्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था, रेत बँक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना आवश्यक नोंदणीसाठी सर्व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

या अधिनियमनातंर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे येथे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्तरावर होणार्‍या दैनंदिन कामकाजासाठी जिल्हा मुख्यालयात जिल्हा कृत्रिम रेतन केद्र याठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. नगरमध्ये डॉ.अरूण हरिश्चंद्रे नुकतेच या पदावर रूजू झाले आहेत. उच्च दुध उत्पादनासाठी जनुकीयदृष्ट्या सुधारित गोवंश निर्माण करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन करण्यासाठी रोगमुक्त, गुणवत्ता पूर्ण वळूंचा वापर सुनिश्चित करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन, विक्रीकर नियंत्रण, कृत्रिम रेतन प्रक्रियेचे शास्त्रीय नियमन व प्रजनन कार्य करणार्‍या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असे विविध उद्देश या नियमनाचे आहेत.

नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्ती, संस्था यांनी नियमनातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड आकारण्यात येईल. रेत केंद्र,भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था यांना पुणे येथील आयुक्तलयातील प्राधिकारणामध्ये नोंदणी करावी लागणार आहे. तसचे रेत बँक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ संबधित यांना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कडे विहित शुल्क भरून नोंदणी करावयाची असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

सर्वसामान्य पशुपालकांच्या हिताचा हा निर्णय असल्याने संबंधीत घटकांनी या अधिनियमाच्या अंमल बजावणीसाठी सहकार्य करावे. नोंदणी संदर्भात अडचणी असतील अथवा काही शंका असतील, संपर्क साधावा असे डॉ. हरिश्चंद्रे यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरचे मुम्मका सुदर्शन नवे एसपी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे...