टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) काही दिवसांपुर्वीच आपले रिब्रँड करत नवीन नाव आणि लोगो जारी केला होता. आता कंपनी व्ही (Vi) या नावाने ओळखली जाते.
यातच आता Vi ला आयपीएल 2020 चे को-स्पॉन्सरशिप मिळाली आहे. याआधी ड्रीम-11 कंपनीला आयपीएलची प्रमुख स्पॉन्सरशिप मिळाली होती.(Vi becomes the co-presenting sponsor of Dream11 IPL 2020)
दोन्ही कंपन्यांचे 2018 विलिनिकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच व्ही ब्रँड अंतर्गत आयपीएलला को-स्पॉन्सर करणार आहे. व्होडाफोन-आयडियाचे आधीही थोड्याफार प्रमाणात आयपीएलमध्ये सहभागी होते.
19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टचे को-स्पॉन्सरशिप हक्क मिळाले आहेत. दरम्यान याआधी Dream-11 ने 222 कोटी रुपयांमध्ये IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. Vi आणि Star Sports मध्ये झालेल्या करारामधील आर्थिक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.