नवी दिल्ली | New Delhi
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (India Vice President Jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. असे जगदीप धनगड यांनी पत्रात म्हटले आहे.
जगदीप धनखड यांनी पुढे म्हटले की, या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.




