नवी दिल्ली | New Delhi –
व्यंकय्या नायडू यांचा मंगळवारी उपराष्ट्रपती म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नायडू मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत केंद्रीय मंत्री होते. 11 ऑगस्ट 2017 रोजी नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. उपराष्ट्रपती म्हणून नायडू यांच्याकडे राज्यसभेचे सभापती म्हणूनही जबाबदारी आहे. Vice President Venkaiah Naidu
उपराष्ट्रपती म्हणून नायडू यांच्या तीन वर्षाच्या कामगिरीचा आढावा असलेले पुस्तक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागाने तयार केले आहे. 250 पृष्ठांच्या या पुस्तकाचे विमोचन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. याच पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकात नायडू यांनी उपराष्ट्रपती म्हणून केलेल्या देशांतर्गत तसेच परदेशातील प्रवासाची माहिती आहे. नायडू यांनी शेतकर्यापासून डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, अशा समाजातील सर्व वर्गातील लोकांशी साधलेल्या संवादाचाही या पुस्तकात समावेश आहे. नायडू यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातील छायाचित्रांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.