Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVice Presidential Election 2025 : उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात; PM मोदींनी...

Vice Presidential Election 2025 : उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात; PM मोदींनी बजावला हक्क

राधाकृष्णन विरुद्ध रेड्डी लढत, कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली | New Delhi

जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती निवडणूक (Vice Presidential Election) जाहीर झाली आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून (NDA) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

- Advertisement -

आज (दि. ९ सप्टेंबरला) सकाळी १० वाजता उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरुवात झाली असून, सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) मतदानाचा हक्क बजावला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. लोकसभेतील ५४२ आणि राज्यसभेतील २४० खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. ७८२ खासदार मतदान (Voting) करु शकतात. त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी ३९२ खासदारांची मते मिळणे आवश्यक आहे.

YouTube video player

सरकारकडे ४२७ खासदारांचा पाठिंबा आहे. ज्यामध्ये लोकसभेतील (Loksabha) २९३ आणि राज्यसभेतील १३४ खासदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षांकडे ३५५ खासदार आहेत. यामध्ये लोकसभेतील २४९ तर राज्यसभेत १०६ खासदार (MP) आहेत. इंडिया आघाडी वगळता विरोधी पक्षात असणाऱ्या काही पक्षांचा मतदान कुणाला करणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

बीजेडी मतदानापासून दूर राहणार

नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ७ राज्यसभा खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय झाला.

डॉ. श्रीकांत शिंदे उमेदवार प्रतिनिधी

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती केली आहे. या निमित्ताने ‘एनडीए’तील भाजपचा सर्वात विश्वासू आणि जुना मित्र पक्ष या नात्याने डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...