Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

वर्धा | Wardha

- Advertisement -

वर्धा येथे होत असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असताना एक अनुचित प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे…

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी वेळीच दखल घेत या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

सिन्नर : ‘त्या’ खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कागद देखील भिरकावले. यंदाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा (Maharashtra) ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचं गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटले आहे.

दिंडोरीतील ‘त्या’ दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद

विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. तसेच विदर्भातील शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि आपल्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भावाद्यांनी हे आंदोलन केले.

पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?

याविषयी एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवाद्यांना याप्रसंगी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या