Wednesday, November 13, 2024
Homeदेश विदेशDigital Arrest : खळबळजनक! फेक कॉलने घेतला शिक्षिकेचा जीव, नेमकं काय घडलं?

Digital Arrest : खळबळजनक! फेक कॉलने घेतला शिक्षिकेचा जीव, नेमकं काय घडलं?

आग्रा । Agra

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला (Government School Teacher) फोन करून तिची मुलगी सेक्स स्कँडल (Sex Scandal) मध्ये अडकल्याचे सांगितले.

- Advertisement -

आम्ही तिला ताब्यात घेतलं आहे, जर तिला सोडवायचं असेल तर एक लाख रुपये पाठवा. ज्यानंतर या शिक्षिका प्रचंड तणावात आल्या. त्यांच्या हृदयावरचा ताण वाढला आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे.

ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. महिलेला आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यानंतर तुमच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलं असून तिला सोडवायचं असेल तर १५ मिनिटांत १ लाख रुपये पाठवा. अन्यथा तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने मुलीचा आवाजही महिलेला ऐकवला. त्यात ती आई मला वाचव, अशी एक व्हॉइस नोटदेखील ऐकवली. आरोपीची धमकी ऐकून शिक्षकेला मोठा धक्का बसला त्यातच तिला हृदयविकाराचा झटका बसला. कुटुंबीयांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तपासणीनंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मालती वर्मा असं या शिक्षिकेचे नाव असून तिचे वय ५८ वर्षे आहे. महिला एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तसंच, या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावपूर्व वातावरण होते. या प्रकरणी एसीपी मयंत तिवारी यांनी म्हटलं की, ३० सप्टेंबर रोजी महिलेचा मृत्यू झाला आणि गुरुवारी याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गांभीर्याने चौकशी केली जात आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या