Saturday, May 25, 2024
HomeनाशिकVideo : कारसूळच्या काजळेंनी उपोषण सुरू करताच पोलिसांकडून उचलबांगडी

Video : कारसूळच्या काजळेंनी उपोषण सुरू करताच पोलिसांकडून उचलबांगडी

निफाड | प्रतिनिधी | Niphad

गावातील मुलभूत प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही. वारंवार निवेदने देऊनही शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे जोपर्यंत मुलभूत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कारसूळ येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी दिला होता.

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन न करण्याचा इशाराही निवेदनात दिला होता. १४ ऑगस्ट रोजी सकाळी प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर पोलिसांसह शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तर पिंपळगाव बसवंत पोलिसांनी गावात येऊन काजळे यांना ताब्यात घेतले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या