Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : दै.'देशदूत' आयोजित ‘नाशिकरोड दर्पण पुरस्कारांचे' वितरण

Video : दै.’देशदूत’ आयोजित ‘नाशिकरोड दर्पण पुरस्कारांचे’ वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दै.’देशदूत’ आयोजित व ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रायोजित ‘नाशिकरोड दर्पण पुरस्कार -2023’ हा शानदार सोहळा आज नाशिक-पुणे रोड येथील हॉटेल नासिक्लब येथे पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिकरोड, देवळाली व भगूर परिसरातील विविध 17 व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या परिसराच्या जडणघडणीत सामान्य नागरिकांपासून अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यक्ती, संस्थांनी योगदान दिले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अशा व्यक्तींच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते. दीपक चंदे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, नाशिकरोड ही माझी जन्मभूमी तसेच कर्मभूमी असून गेल्या 35 वर्षांपासून येथे मी कार्यरत आहे. नाशिकरोडची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुरस्कारार्थ्यांमध्ये अनेक व्यक्तींसोबत मी लहानाचा मोठा झालो आहे. या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करताना मनस्वी आनंद होत आहे. संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले प्रास्ताविक केले. ‘देशदूत’ने नेहमीच पालकाची भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यासह राज्यातील इत्यंभूत घडामोडींवर ‘देशदूत’चे बारकाईने लक्ष असते. समाजात चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींच्या मागे उभे राहण्याचे काम ‘देशदूत’ नेहमी करतो. नाशिकमध्ये ‘देशदूत’चा पहिला दर्पण पुरस्कार नाशिकरोडच्या रूपाने होत आहे. नाशिक शहराच्या जडणघडणीत नाशिकरोडचे देखील महत्वाचे योगदान आहे, असे डॉ. बालाजीवाले म्हणाल्या.

याप्रसंगी डॉ. गुजर सुभाष हायस्कूलचे सचिव रतन चावला, मुख्याध्यापक बन्सीलाल गाडी लोहार, ऍड बाळासाहेब आडके, मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम, प्रतिनिधी विशाल जमधडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरजे अमित यांनी सूत्रसंचालन केले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी आभार मानले.

‘नाशिकमध्ये वेगळीच ऊर्जा’

आरजे अमित यांनी अभिनेत्री उर्मिला यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. नाशिकमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. नाशिकला आल्यावर नेहमीच चांगले वाटते. कार्यक्रमाबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारल्यावर उर्मिला म्हणाल्या, चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देणे ही माझे भाग्य समजते. नाशिकमध्ये अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. सोशल मीडिया हे आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. त्यातून आपले कौशल्य लाखो लोकांपर्यंत पोहोचते. माणसाने नेहमी प्रयत्नशील राहावे, प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास इच्छित ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचतो. अभिनेत्री झाले नसते तर कथक नृत्य मध्ये मी माझे करिअर केले असते, असे त्या म्हणाल्या. शिक्षण महत्त्वाचे आहे मात्र, प्रत्येकाने पर्यायी मार्ग देखील ठेवायला हवा. प्राप्त केलेले ज्ञान कधीही वाया जात नाही त्यामुळे प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकत राहून वेळेचा सदुपयोग करायला हवा. उर्मिलाने त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला तसेच सर्वांना दिवाळीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पुरस्कारार्थी

जयश्री गायकवाड-नाशिकरोड, सुहासिनी घोडके-नाशिकरोड, मच्छिंद्र पोरजे-नाशिकरोड, किरण खर्जुल-नाशिकरोड, अतुल घोगडे-नाशिकरोड, शिलाताई दुबे-सरपंच, दोनवाडे, दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिकरोड, दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड, दि इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. नाशिकरोड, ग्रामपंचायत शिंदे, ता. जि. नाशिक, रुचिका महिला मंडळ, नाशिकरोड, इच्छापूर्ती शिवमंदिर समिती-भगूर, मांडे लॉन्स-देवळाली कॅम्प, स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था, जेलरोड-नाशिकरोड, सानेगुरुजी प्रसारक मंडळ-नाशिकरोड, ग्रामपालिका पळसे-ता. जि. नाशिक, डॉ. गुजर सुभाष हायस्कुल, देवळाली कॅम्प.

- Advertisment -

ताज्या बातम्या