नवी दिल्ली | वृत्तसंस्था |New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) सध्या जपान दौऱ्यावर असून जपानच्या हिरोशिमा शहरामध्ये सुरु असलेल्या जी-७ शिखर परिषदेत (japan g 7 summit) सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा या जी-७ बैठकीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे…
या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे चालत आल्याचे दिसत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि बायडेन यांच्या या गळाभेटीची सध्या जोरदार चर्चा सुरु असून या गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जपानच्या हिरोशिमामध्ये आंतरराष्ट्रीय जी-७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहभागी झाले आहेत. बायडेन आणि मोदी यांच्या या गळा भेटीमुळे चीनला मात्र धडकी भरली आहे.
परिषदेच्या एका सत्रात पंतप्रधान मोदी हे देखील सहभागी झाले. यावेळी जो बायडन स्वतःहून पंतप्रधान मोदी यांच्या आसनापाशी आले व त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अवघ्या काही सेकंदांची ही भेट होती. मात्र, जो बायडन यांनी स्वतःहून येऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणे हा विषय जागतिक पातळीवर चर्चेचा बनला आहे.
आदित्य ठाकरेंचा नोटबंदीवरुन सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…
तसेच जी-७ च्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Zelenski) यांची देखील भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांच्याशी युद्धस्थितीबबात चर्चा केली. तसेच मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची देखील भेट घेतली. यावेळी दोघांनी गळाभेट घेऊन एकमेकांचे स्वागत केले. या भेटीचे फोटो सुनक यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला धडकली
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्यावर म्हटले की, युक्रेन युद्ध हा जगासाठी मोठा मुद्दा आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. हे युद्ध राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण सगळ्यांशी निगडीत आहे. युद्ध थांबवण्यासाठी मी भारताच्या वतीन संपूर्ण सहकार्य करेन असे आश्वासन त्यांनी झेलेन्स्की यांना दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-७ परिषदेमध्ये सहभागी होण्यापूर्वी हिरोशिमा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या परिषदेत जापान आणि अमेरिका या देशांशिवाय ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इटलीसोबत युरोपीय संघांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा जपान दौरा २१ मेपर्यंत असणार आहे.