Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेशकेदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; फुलांनी सजलं मंदिर, पाहा व्हिडिओ

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; फुलांनी सजलं मंदिर, पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

- Advertisement -

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मंदिरे बंद आहे.

दरम्यान उत्तराखंडमधील पर्वतरागांमध्ये असणाऱ्या जगप्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराची दरवाजे तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आज सोमवारी पहाटे ५ वाजता उघडण्यात आली. या क्षणाचं औचित्य साधत मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल ११ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला.

मागील वर्षीप्रमाणंच यंदाही करोनाचं संकट अधिक बळावल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरच्या माहिती दिली. ‘संपूर्ण जगात ११ वं ज्योतिर्लिंग म्हणून भगवान केदारनाथची ख्याती आहे. मंदिराची दरवाजे सोमवारी पहाटे ५ वाजता परंपरागत पूजा- अर्चा केल्यानंतर उघडली. मेष लग्नाच्या शुभमुहूर्तावर हा विधी पार पडला. मी बाबा केदारनाथ यांच्याकडे सर्वांनाच निरोगी ठेवण्याची प्रार्थना करतो’, असं ट्विट त्यांनी केलं. तसेच, ‘मंदिरात भाविकांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरीही, भाविकांनी घरुनच केदारनाथाला श्रद्दासुमनं अर्पण करावील असं आवाहनही त्यांनी केलं. सोबतच मंदिरात दररोज श्री भीमाशंकर लिंगम् यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित दैनंदिन पूजा-अर्चा करतील’ अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या