Saturday, November 23, 2024
HomeमनोरंजनVideo: रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही; भरत जाधव असं का म्हणाले?

Video: रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही; भरत जाधव असं का म्हणाले?

रत्नागिरी | Ratnagiri

रत्नागिरीत नाट्यप्रयोगादरम्यान भरत जाधव यांनी एक अनुभव आला आहे. या अनुभवानंतर त्यांनी रत्नागिरीत पुन्हा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन प्रयोगादरम्यानच त्यांनी हात जोडत रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असे म्हटले आहे. भरत जाधव यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे…

- Advertisement -

रत्नागिरीत भरत जाधव यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाले. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.

G-7 Summit : PM Modi ठरले सर्वाधिक लोकप्रिय नेते, ‘या’ बड्या नेत्यांना टाकलं मागे

दरम्यान, भरत त्यांच्या कुटुंबीयांबरोबर गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरला राहत आहे. त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्यांच्या नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल होत होते. पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक् झाले. हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलासह आईची गळफास घेत आत्‍महत्‍या

मुंबई आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे, म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पैसे तर कमवायचे, पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो, असे भरत जाधव यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Crime : कर्जाचे आमिष दाखवून दिला ५ कोटींचा बनावट डीडी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या