Saturday, March 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपने १० नावं दिल्लीत वरिष्ठांना पाठवली; 'या' नावांचा समावेश

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपने १० नावं दिल्लीत वरिष्ठांना पाठवली; ‘या’ नावांचा समावेश

मुंबई | Mumbai
राज्यात विधानपरिषद निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी १० नेत्यांच्या नावांची यादी दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या यादीत दोन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने १० नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, महिलांमध्ये पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

या यादीमध्ये अमित गोरखे,परिणय फुके ,सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर विधानपिरषद निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. ११ जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपले गणित पक्के असल्याचे सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक वक्तव्यही केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dhananjay Munde-Karuna Sharma : “करुणासोबत अधिकृत लग्न केलेलं नाही, पण मुलांना...

0
मुंबई | Mumbai माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा-मुंडे यांना दर महिन्याला...