Thursday, January 8, 2026
HomeनाशिकVidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदार संघासाठी तीन अर्ज दाखल

Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदार संघासाठी तीन अर्ज दाखल

नाशिक रोड । प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहे. तर 39 जणांनी अर्ज नेले आहे.

- Advertisement -

येत्या 26 जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी कोपरगावचे विवेक बिपिन कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले तर दुसरा अर्ज छगन भिकाजी पानसरे यांनी दाखल केला असून असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

YouTube video player

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 जून रोजी असून 10 जून रोजी अर्ज छाननी होणार आहे तर 12 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे नाशिक नंदुरबार नगर धुळे जळगाव या पाच जिल्ह्यातून एकूण 70 हजार 341 मतदारा आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

ताज्या बातम्या