Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; नाशिकसह 'या'...

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; नाशिकसह ‘या’ मतदारसंघांमध्ये रणधुमाळी, १८ जूनला मतदान, मतमोजणी कधी?

मुंबई | Mumbai

राज्यात पुन्हा एकदा विधानपरिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी उडणार असून, पावसाळी अधिवेशनाआधी विधानपरिषदेच्या सदस्यसंख्येत वाढ होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

या जागांसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान (Voting) होणार असून, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल. गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार (Voter) संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधानपरिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून (Local Body Election) निवडून देण्यात येणाऱ्या १६ जागांसह एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर (Vidhansabha) निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर ही पोटनिवडणूक पार पडणार आहे.

विधानपरिषदेच्या कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला होता

प्रशांत प्रभाकर परिचारक, अरुणकाका बालभीमराव जगताप, रवींद्र सदानंद फाटक, चंदूभाई व्ही. पटेल मोहनराव श्रीपति कदम, अमरनाथ अनंतराव राजूरकर, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, अनिल शिवाजीराव भोसले, डॉ. परिणय रमेश फुके, अनिकेत सुनील तटकरे, नरेंद्र भिकाजी दराडे, रामदास भगवानजी आबिटकर, प्रवीण रामचंद्र पोटे, सुरेश धस, विप्लव गोपीकिसन बजोरिया, अंबादास दानवे

कोणत्या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती,धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना – २५ मे २०२६
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ०१ जून २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी – ०२ जून २०२६
अर्ज माघारीची मुदत – ०४ जून २०२६
मतदान – १८ जून २०२६ (स. ८ ते दु. ४)
मतमोजणी – २२ जून २०२६

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

Devendra Fadnavis: पुढल्या २० वर्षांचे आपले…; शरद पवारांकडून मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai"राजकीय विचारसरणी आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी देशहिताच्या मुद्द्यावर कधीही राजकारण आणता कामा नये," अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...