Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष;...

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष; CM फडणवीसांनी मांडला प्रस्ताव

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याचा मला मनापासून आनंद आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

‘भारताचे संविधान किती मोठे आहे. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री झालेत. आता तर टपरीवर ज्यांनी काम केले ते उपाध्यक्ष झालेत. याबद्दल विरोधकांचेदेखील स्वागत करतो. कारण त्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली.” असे फडणवीस विधानसभेत म्हणाले.

कोणाची नावे होती चर्चेत?
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव चर्चेत होतेच मात्र त्यांच्या नावाशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

कोण आहे अण्णा बनसोडे?
अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर २०१९ आणि २०१४ असे सलग दोनवेळा आमदारपदी विराजमान झाले. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले, आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...