Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली...

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या (MLA Disqualification) याचिकेसह दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून नुकतेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते…

- Advertisement -

त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या असून नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने अखेर अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या (Hearing) कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशातच आता आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Shivsena Crisis : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

यावेळी बोलतांना राहुल नार्वेकर म्हणाले की, “या विषयावर अधिक बोलणे उचित राहणार नाही. या याचिका (Petition) ठरवत असतांना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. कालच्या निकालात सुनावणी कशी होणार, त्याची प्रक्रिया काय असणार यासंदर्भातील माहिती सर्व पक्षकारांना दिली आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई पुढे जाईल. लवकरच यासंदर्भातील निकाल देऊन या विषयाला मार्गी लावू.” असे नार्वेकर यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. न्यायालायनेही योग्य ती सूचना दिली आहे. न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्षांचीही बाजू न्यायालयात मांडली जाईल”, असेही राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाविषयी होत असलेल्या दिरंगाईबद्दल सांगितले.

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक आठवड्याच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. घाना देशात ६६ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे. राहुल नार्वेकर हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह घाना दौऱ्यावर जाणार आहेत. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत घाना देशात राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे. या परिषदेत जगातील विविध देशांमधील संसद आणि विधीमंडळ प्रमुख उपस्थित राहाणार असून जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना

- Advertisment -

ताज्या बातम्या