Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांना मोठा धक्का! अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी; दोन्ही गटाचे...

शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी; दोन्ही गटाचे आमदार पात्र

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज निर्णय दिला आहे. नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवारांची (Ajit Pawar) यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे असल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसारच नार्वेकरांनी निर्णय दिला असून दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत…

- Advertisement -

राज्यसभेसाठी महाविकासआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी दाखल केले अर्ज

यावेळी राहुल नार्वेकर निकाल देताना म्हणाले की, ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपली असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. दोन्ही गटांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. ३० जून रोजी ४१ आमदारांनी (MLA) अजित पवारांना अध्यक्ष मानले. निकाल देताना संख्याबळ लक्षात घेतले. सचिवालयातील कागदपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला. त्यामुळे पक्ष घटना, नेतेपदाची रचना, विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवण्यात आल्याचे नार्वेकरांनी सांगितले.

भाजपकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं

तसेच ३० जून रोजी अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे अजित पवार हे अध्यक्ष झाले. तसेच २९ जून पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदावर आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे ३० जून रोजी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन क्लेम करण्यात आले. दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत असा दावाही नार्वेकरांनी केला. तसेच अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्याचे नार्वेकरांनी म्हटले.

एमडीचा विळखा सुटेना; युवकाकडून ८७ हजारांचे मेफेड्राेन हस्तगत

- Advertisment -

ताज्या बातम्या