Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी इच्छुकांची तोबा गर्दी; कुणाची...

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी इच्छुकांची तोबा गर्दी; कुणाची लागणार लॉटरी?

नाशिक जिल्ह्यातील 'या' मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) तोंडावर आल्याने इच्छूकांकडून राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विशेषतः महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aaghadi) अनेकांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (Sharad Pawar NCP) उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांची रीघ लागल्याचे दिसून येत आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळावी यासाठी तब्बल १३५० इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला ८५ ते ९० जागा मिळण्याची शक्यता आहे. या ८५ ते ९० जागांसाठी तब्बल १३५० इच्छुक उमेदवारांचे (Interested Candidates) पक्षाकडे अर्ज प्राप्त झाले आहे. राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी जास्त अर्ज आल्याची माहिती असून यात मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, माळशिरस, देवळाली आणि अनुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :  मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

देवळाली विधानसभा मतदारसंघातून (Deolali Assembly Constituency) उमेदवारीसाठी तब्बल ३८ जणांनी अर्ज केले आहेत. या मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सरोज अहिरे निवडून आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाणे पसंत केले. तसेच नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून ९ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. तर मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून १३ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय राज्यातील इतर मतदारसंघातून देखील अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

हे देखील वाचा : Political Special : राष्ट्रवादीच्या प्रचाराचे रणशिंग; शिवस्वराज्य यात्रेवेळी इच्छुकांची भाऊगर्दी

इच्छुकांनी अर्जासोबत दिले प्रतिज्ञापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या बहुतांश इच्छुकांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहेत. त्यात उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार नाही, असे बाँड पेपरवर लिहून देण्यात आलेले आहे. तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देईल, असेही इच्छुक उमेदवारांनी बाँडवर लिहून दिले आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतून बंडखोरी होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या