Friday, November 22, 2024
HomeराजकीयVijay Wadettiwar : "महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना…"; Video...

Vijay Wadettiwar : “महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना…”; Video शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

राज्य सरकारने आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये जमा केले आहेत.

- Advertisement -

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा एक व्हिडिओ ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवारांनी एक्सवर भाजप नेते आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.

महिलांना ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या योजेनसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम तीन हप्त्याचे पैसे म्हणजेच ४ हजार ५०० रुपये जमा होऊ शकतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या